loader image
Select Page

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

आम्ही काय केलं.

जेंव्हा महाराष्ट्राधर्मावर संकट आलं तेंव्हा आम्ही संघर्ष केला, तुरुंगवास सोसला. तरीही जेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काय केलं? तुम्ही आंदोलनं अर्धवट सोडली असं काही मूठभर म्हणतात, तेंव्हा त्रास होतो. त्या अपप्रचाराला उत्तर आणि माझ्या महाराष्ट्रातील जनतेला सादर केलेला अहवाल.

विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा !

शिवछत्रपतींच्या रूपाने सह्याद्रीच्या कड्याकपारीतून उगवलेल्या क्रांतिसूर्याने दास्यत्वाने पिचलेल्या मनांना उभारी दिली. 

मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा!

अखंड महाराष्ट्राशी एकरूप झालेल्या प्रत्येकाच्या समृद्धीसाठी आणि पुर्नउत्थानासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कटिबद्ध.

जंगलं नसतील तर काय करणार ?

आता जर काही पुढच्या पिढ्यांसाठी ठेवून जायचं असेल तर जंगलं टिकवायला हवीत,शालेय जीवनापासून मुलांवर जंगल संवर्धनाचे संस्कार व्हायला हवेत, देशात पर्यावरणपूरक राजकारण व्हायला हवं.

आंदोलनं व उपक्रम

जनतेच्या अनेक प्रश्नांवर आंदोलनं हाती घेतली. निवेदनं, शिष्टमंडळांमार्फत संबंधितांपर्यंत लोकांच्या समस्या पोहचविल्या.
प्रश्न तडीस नेले. तसंच व्यवस्थेकडून प्रतिसाद न मिळाल्यास प्रसंगी टोकाचा संघर्षही केला.

नागरी आंदोलनं

वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर शहराचा सर्वांगीण विचार करून पायाभूत सुविधा उभ्या करण्यावर, त्यासाठी संघर्ष करण्यावर आमचा भर असतो.

पुढे वाचा

मराठी मनांसाठी, हिंदू सणांसाठी

आमच्या भावनांचा विचार न करता, सहिष्णुतेची सबब पुढे करून आमच्या सणांवर गंडांतर येणार असेल तर आम्ही ते मान्य करणार नाही.

पुढे वाचा

विद्यार्थी आंदोलनं

राज्यातील विविध भागातील अनेक संस्थाचालकांनी शिक्षणाचं जो बाजार मांडला होता त्याला पहिला दणका दिला तो महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने.

पुढे वाचा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं स्फूर्तीगीत

पुढील कार्यक्रम

जंगलं नसतील तर करणार काय?

आता जर काही पुढच्या पिढ्यांसाठी ठेवून जायचं असेल तर जंगलं टिकवायला हवीत, बोटॅनिकल गार्डन्स जागोजागी उभारायला हवीत, प्रत्येक झाड तोडताना हात थरथरला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शालेय जीवनापासून मुलांना जंगलं दाखवायला हवीत, तो अनुभव त्यांचे विचार बदलेल. देशात पर्यावरणपूरक राजकारण व्हायला हवं.

गुढीपाडवा मेळावा २०२४ । भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

गुढीपाडवा मेळाव्याच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे : निवडणूक आयोगाने आता आरोग्यसेवकांनाही निवडणुकीच्या कामात जुंपलं आहे, हे चुकीचं आहे. आरोग्यसेवकांनी रुग्णांची सेवा करत रहावी, तुम्हाला निवडणुकीच्या...

केंद्रीय सत्तेने दिल्लीवर ताबा मिळविला, आता मुंबई ?

केंद्रीय सत्तेने दिल्लीवर ताबा मिळविला, आता मुंबई ? | श्री. अनिल शिदोरेकाही दिवसांपूर्वी दिल्लीबाबतच्या विधेयकावरून लोकसभेत वातावरण तापलं होतं. असं काय आहे त्यात...

हिंदवी स्वराज्याचा शिवसूर्योदय !

ही एका घराण्याच्या राजगादीची स्थापना नव्हती, तर तेव्हा त्रासलेल्या सर्व हिंदू मनांना आपलं सार्वभौम राज्य असावं, ही प्रेरणा ज्या घटनेनं दिली, ती घटना म्हणजे राज्याभिषेक सोहळा होता. या राज्याभिषेकायोगे महाराजांनी मुघल आक्रमकांच्या विरोधातील एक जाहीरनामाच घोषित केला. त्याचे पडसाद पुढं अगदी थेट आसाम, बंगालपर्यंत उमटले. मऱ्हाठा साम्राज्याचा झेंडा अटकेपार गेला; पण त्याची बीजं महाराजांच्या राज्याभिषेकात आहेत, हे विसरून चालणार नाही.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अधिकृत समाजमाध्यमं

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.

दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.

दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .

© २०२३ सर्व हक्क आरक्षित. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मध्यवर्ती कार्यालय.