loader image
Select Page

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

पक्षाविषयी

पक्षाची ध्येय धोरणं

महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र प्रदेश आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

7

पक्षाविषयी

पक्षाची ध्येय धोरणं

ध्येय धोरणं

१) अखंड महाराष्ट्र राज्य, मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसाच्या आणि ह्या भूमीशी एकरूप झालेल्या प्रत्येकाच्या भौतिक समृद्धीसाठी आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक-सामाजिक पुर्नउत्थानासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कटिबद्ध आहे.

२) ‘महाराष्ट्रधर्मा’चं स्वाभिमानाने पालन करताना, महा’राष्ट्रधर्मा’चं उत्तरदायित्व देखील आम्हाला अभिप्रेत आहे. ह्या भूमीतील बहुसंख्याकांच्या धार्मिक-सांस्कृतिक-सामाजिक धारणा आणि जीवनपद्धतींचा यथायोग्य सन्मान राखला गेलाच पाहिजे आणि निव्वळ काही समूहांच्या लांगूलचालनाने किंवा अनुनयाने बहुसंख्याकांवर अन्याय होणार नाही त्यायोगे दक्ष राहण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वचनबद्ध आहे.

३) रस्ते, रेल्वे, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, महिला, कामगार, आदिवासी विकास, गृह, कायदा व सुव्यवस्था, कृषी, पर्यटन, वित्त, व्यापार, व्यवसाय, सहकारी क्षेत्र किंवा केंद्र-राज्य संबंध अशा प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्राला अग्रणी ठेवण्यासाठी दूरदृष्टीने प्रारूप बनवणं आणि ते राजकीय सत्तेच्या माध्यमातून ते राबवणं, हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसमोरील प्रमुख ध्येय आहे.

४) जागतिकरणाच्या ह्या युगात ‘मृदू सत्ता’ (सॉफ्ट पॉवर) ही खरी सत्ता आहे आणि मराठी भाषा, संस्कृती, ऐतिहासिक अधिष्ठान, साहित्य, कला, परंपरा, खाद्यसंस्कृती ह्यांच्यात मराठीला मृदु सत्ता बनवण्याची ताकद आहे. हे संस्थात्मक, रचनात्मक उभारणीच्या माध्यमातून साध्य करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव प्रयत्नशील असेल.

५) ‘जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणं’ हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अंतिम ध्येय आहे.

। मुखपृष्ठ 

 पक्षाविषयी : प्रमुख भूमिका ।

शेअर करा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.

दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.

दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .

© २०२३ सर्व हक्क आरक्षित. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मध्यवर्ती कार्यालय.