आंदोलनं व उपक्रम
आम्ही काय केलं.
आंदोलनं व उपक्रम
आम्ही काय केलं
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या १७ वर्षांत काय केलं हे मांडणं गरजेचं होतं. हे फक्त काही टीका करणाऱ्या त्या चार तोंडांसाठी नाहीये तर महाराष्ट्रातील जनतेला पण सादर केलेला अहवाल आहे.
आम्ही काय केलं.
सस्नेह जय महाराष्ट्र
आज ९ मार्च २०२३ ला ही पुस्तिका महाराष्ट्राला सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेला १७ वर्ष पूर्ण झाली; ह्या काळात निवडणुकीच्या राजकारणात पक्षाने अनेक चढउतार पाहिले. पण तरीही माझा महाराष्ट्र सैनिक खचला नाही. मराठी माणूस, मराठी भाषा, आणि महाराष्ट्र हा आमचा श्वास आहे तर हिंदुत्व हा आमच्या कडव्या अभिमानाचा विषय आहे. ह्या दोन्हीवर जेंव्हा जेंव्हा संकट आलं तेंव्हा तेंव्हा आम्ही संघर्ष केला, तुरुंगवास सोसला. इतकं सगळं होऊन देखील जेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काय केलं? तुम्ही आंदोलनं अर्धवट सोडली असं काही मूठभर म्हणतात, तेंव्हा निश्चित त्रास होतो.
ह्या असल्या चर्चानी मी यत्किंचित पण हलत नाही, पण वाईट वाटतं ते माझ्या महाराष्ट्र सैनिकांसाठी. त्यांनी स्वतःच आयुष्य ह्या आंदोलनांसाठी पणाला लावलं, ह्या काळात त्यांच्या घरच्यांच्या जीवाला किती घोर लागला असेल ह्याची मला कल्पना आहे.
ह्या सगळ्याचा विचार करून ठरवलं की माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या १७ वर्षांत काय केलं हे मांडलं पाहिजे. हे फक्त काही टीका करणाऱ्या त्या चार तोंडांसाठी नाहीये तर महाराष्ट्रातील जनतेला पण सादर केलेला अहवाल आहे.
हा अहवाल, फक्त राज्यव्यापी पातळीवर हाती घेतलेल्या आंदोलनांचा आणि उपक्रमांचा एक आढावा आहे. जिल्ह्या-जिल्ह्यात, विविध शहरांमध्ये जी आंदोलनं हाती घेतली गेली किंवा जे उपक्रम राबवले गेले, त्या सगळ्याचा समावेश जर ह्या पुस्तिकेत करायचा ठरला असता तर, ही पुस्तिका न राहता तो एक ग्रंथ झाला असता, इतकं काम माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी केलं आहे.
सत्ता नसताना, जर माझा पक्ष इतकं काम करू शकतो, तर सत्ता आल्यावर काय करू शकेल ह्याचा अंदाज तुम्हाला यावा म्हणून हा प्रयत्न.
मी नेहमी म्हणतो आमची सत्ता रस्त्यावर, जी आम्ही संघर्षातून मिळवलीच. पण आता सत्ता संसदीय सभागृहांमध्ये देखील मिळवायची आहे, कारण ह्याच्या जोरावर आम्ही अधिक प्रभावी काम करून दाखवू शकू. आणि ती सत्ता महाराष्ट्राच्या जनतेकडे मागताना आम्ही इतरांपेक्षा जास्त लायक आणि प्रामाणिक आहोत हे तुम्हाला कळावं ह्यासाठीच हा प्रयत्न.
‘आम्ही काय केलं… ‘ ह्याचा हा अहवाल, जरूर वाचा.
महत्त्वाचे दुवे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.
दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.
दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .