loader image
Select Page

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

आंदोलनं व उपक्रम

आपत्तीतलं मदतकार्य

आंदोलनं व उपक्रम

आपत्तीतलं मदतकार्य

महाराष्ट्रावर, महाराष्ट्र धर्मावर जेव्हा जेव्हा संकट येईल तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वात आधी त्या संकटासमोर उभी ठाकणार. मग ते संकट कोणत्याही स्वरूपातील असो मदतीला सर्वप्रथम धावून जाणारा महाराष्ट्र सैनिकच असतो.

7

कोरोना महासाथीतलं मदतकार्य

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमदार श्री. राजू पाटील ह्यांनी स्वतः संपूर्ण रुग्णालय कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी दिलं. मनसे नेते श्री. अमित ठाकरे ह्यांनी १०,००० मुखपट्ट्या (मास्क) आणि स्व-संरक्षण कवच (पीपीई किट) कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पाठविले. स्व-संरक्षण कवच घातल्यानंतर १२-१२ तास वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांना खाण्या-पिण्यास वेळ मिळत नव्हता म्हणून शक्तिवर्धक खाद्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पुरविण्यात आलं. मनसे नेत्यांनी महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अन्न-धान्याचा पुरवठा सुरु केला. इतर रोगांवर रुग्णांना उपचार मिळावे म्हणून डॉक्टर आपल्या दारी ही संकल्पना राबविली.

| शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे

महाराष्ट्र सैनिकांनी रोग प्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या औषधांचं, सॅनिटायझर्सचं वाटप सुरु केलं. सर्व जनता टाळेबंदीमुळे घरीच असले तरी सफाई कर्मचारी, शासकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी ह्यांना कर्तव्य बजावताना त्रास होऊ नये म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी प्रशासनाला सहकार्य केले. कोरोना संशयित अथवा इतर रुग्ण उपचारापासून वंचित राहता कामा नये म्हणून महाराष्ट्र सैनिक कमालीचा पाठपुरावा करत होते. श्री. राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र सैनिकांच्या कामाचा आढावा घेण्याबरोबरच राज्य आणि केंद्र सरकारला सूचना करत होते.

दुष्काळ

२०१३ ते २०१७ ह्या काळात महाराष्ट्राने दुष्काळाने होरपळला होता. शेतीलाच काय तर प्यायलाही पाणी नव्हतं, भूजल पातळी कमालीची खालावली होती. शेतकऱ्यांवर पशुधन वाऱ्यावर सोडण्याची वेळ आली होती. महाराष्ट्रात एका जिल्ह्यातून-दुसऱ्या जिल्ह्यात रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागत होता. अशा भीषण परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राज्याच्या अनेक भागांमध्ये चारा छावण्या उभारण्यात आल्या. मोक्याच्या ठिकाणी पाण्याची तळी बांधण्यात आली.

दुष्काळाचा दाह पाहता सन्मा. राजसाहेबांनी एक कार्यक्रम हाती घेतला. शक्य तिथे तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना टँकरने पाणीपुरवठा करणार आणि पाणी साठविण्यासाठी लागणाऱ्या टाक्या वाडी-वस्त्यांना देण्यात येतील. आणि ही जबाबदारी स्वीकारली पक्षाचे सरचिटणीस श्री. मनोज चव्हाण ह्यांनी. मराठवाडा, विदर्भात तसंच मेळघाट, चिखलदरा अशा दुर्गम भागांमध्ये जेव्हा जेव्हा गरज लागली तेव्हा ५ वर्ष सातत्याने टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. ५००० लीटरच्या पाण्याच्या टाक्या वाडी-वस्त्यांना दान करण्यात आल्या. ज्या तडफेने श्री. मनोज चव्हाण ह्यांनी हा कार्यक्रम राबविला त्यामुळे लोकं त्यांना ‘वॉटरमॅन’ म्हणजेच ‘जलदूत’ म्हणू लागले.

| शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे

अनेक दुर्गम गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला, पाण्याची साठवण करण्यासाठी ग्रामस्थांना पाण्याच्या टाक्या देण्यात आल्या, विहिरीतील गाळ काढून विहिरी पुनर्जीवित करण्यात आल्या. सरकारमार्फत येणारी मदत ग्रामस्थांपर्यंत पोहचावी ह्यासाठी महाराष्ट्र सैनिकांनी प्रशासनाशी पाठपुरावा सुरु केला.

तत्पर महाराष्ट्र सैनिक

| तत्पर महाराष्ट्र सैनिक 

मुंबई आणि लगतच्या शहरांमध्ये अतिवृष्टी झाल्यावर मदतकार्यासाठी सरसावणारा हाच महाराष्ट्र सैनिक उत्तराखंडमध्ये ढगफुटी होते किंवा भारतातील अन्य राज्यात नैसर्गिक आपत्ती येते तेव्हाही मदत करण्यास आघाडीवर असतो. नेपाळ येथे झालेल्या भूकंपानंतर तेथे औषधे, वैद्यकीय साहित्याची कुमक महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे पाठवली गेलेली महाराष्ट्राने पाहिली आहे.

। आंदोलनं व उपक्रम : समाजाभिमुख उपक्रम

विकासनामा : दर्जेदार जीवनमान ।

शेअर करा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.

दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.

दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .

© २०२३ सर्व हक्क आरक्षित. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मध्यवर्ती कार्यालय.