loader image
Select Page

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

पक्षाविषयी

मुख्य कार्यकारिणी

पक्षाविषयी

मुख्य कार्यकारिणी

महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र प्रदेश आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

7

श्री. राज ठाकरे

अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना
सस्नेह जय महाराष्ट्र.

९ मार्च २००६, मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली तेंव्हा खरंच सांगतो मनात धाकधूक होती. मी एका ध्येयाने बाहेर पडून काहीतरी स्वतःच, आपल्या सगळ्यांचं असं काही तरी उभं करायला निघालो आहे पण तुम्ही सगळं हे कसं स्वीकाराल, लोकं कसं स्वीकारतील ही धाकधूक होती. पण १९ मार्च २००६ च्या पक्ष स्थापनेनंतरच्या शिवतिर्थावरच्या सभेत मी स्टेजवर पाऊल ठेवलं आणि समोर पसरलेला अलोट जनसमुदाय पाहिला… आणि मनातील शंका दूर झाली. माझ्या सोबत कोणालाही हेवा वाटेल अशी महाराष्ट्र सैनिकांची अचाट शक्ती होती, ह्या शक्तीचा माझ्यावर अढळ विश्वास आहे ह्याची मला खात्री पटली.

गेल्या १७ वर्षात माझी महाराष्ट्र सैनिक रुपी संपत्ती माझ्यासोबत टिकून आहे, ती कितीही खाचखळगे आले, अडचणींचा डोंगर समोर उभा राहिला तरी माझ्यासोबत आहे ह्याच्या इतकी आनंदाची दुसरी बाब ती काय. आपल्यातले काही जण सोडून गेले, जाऊ दे. त्यांना त्यांचा निर्णय लखलाभ ठरो. पण जे माझ्यासोबत सह्याद्रीच्या कडांसारखे टणकपणे टिकून आहेत त्यांना मी इतकंच सांगेन की मी तुम्हाला कधीच विसरणार नाही, आणि पक्षाला जे जे यश भविष्यात मिळेल त्याचे वाटेकरी तुम्हीच असाल, हे माझं तुम्हाला वचन आहे. मी मनापासून सांगतो की तुम्ही जे १७ वर्षात करून दाखवलंत ते अफाट आहे. कोणतीही धनशक्ती पाठीशी नसताना, राजकीय पार्श्वभूमी नसताना, स्वतःचा नोकरी-व्यवसाय सांभाळून तुम्ही समाजकारणात आणि राजकारणात स्वतःला ज्या पद्धतीने रुजवलंत ते खरंच कौतुकास्पद आहे. हजारो आंदोलनं, महाराष्ट्रभर शेकड्यानी निघालेले मोर्चे, अटकसत्र, जेलच्या वाऱ्या आणि हे सगळं कशासाठी तर आपल्या भाषेसाठी, आपल्या मराठी माणसाच्या हितासाठी, त्याच्या न्याय्य हक्कांसाठी आणि स्वधर्म रक्षणासाठी. ह्या सगळ्यासाठी तुमच्याबद्दल माझ्या मनात कृतज्ञता आहेच आणि ती आयुष्यभर राहील, पण मी खात्रीने सांगतो की महाराष्ट्राच्या मनात देखील तुमच्या बद्दल कृतज्ञतेची भावना आहे.

आपण निवडणुकीत यश पाहिलं, पराभव पाहिला आणि पराभव पचवून देखील तुमच्यातील लढाईची उर्मी कमी झाली नाही ह्याचा मला खरंच अभिमान आहे. महाराष्ट्रातील आजही प्रत्येक घटकाला जेंव्हा वाटतं की आमचा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच सोडवू शकेल त्यातच भविष्यातील उषकालाची बीज रोवली आहेत हे विसरू नका. मी ह्या आधी पण सांगितलं होतं आणि आज पुन्हा सांगतो, मला कुठे जायचं आहे, कसं जायचं आहे हे नीट माहीत आहे आणि मी तिथे जाणार ते देखील तुम्हाला सोबत घेऊनच.

तुमचे श्रम, घाम, रक्त हे वाया जाणार नाही. ह्या सगळ्या १७ वर्षांच्या प्रवासात तुमच्या घरच्यांनी देखील खूप त्याग केला आहे, सोसलं आहे, मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना देखील सांगू इच्छितो की आमच्या प्रवास खडतर आहे पण गरुडभरारी घेण्याची शक्ती तुमच्या सदिच्छांमुळे आमच्या पंखात आली आहे आणि त्याच्या जोरावर आम्ही सगळी आव्हानं सहज पेलवून पुढे जाऊ. जे महाराष्ट्र धर्माच्या आणि हिंदू धर्माच्या आड येतील, जे लुच्चेपणा करून महाराष्ट्राला फसवू पाहतील, इथल्या सामान्य माणसाला लुबाडू पाहतील त्यांच्या पाठीत माझा महाराष्ट्र सैनिक सोटा हाणणार हे नक्की.

आपला नम्र,
राज ठाकरे

पक्षाचं नेतेमंडळ

श्री. बाळा नांदगावकर

नेता – प्रवक्ता

श्री. नितीन सरदेसाई

नेता – प्रवक्ता

श्री. शिरीष सावंत

नेता

श्री. अविनाश अभ्यंकर

नेता – प्रवक्ता

श्री. अनिल शिदोरे

नेता – प्रवक्ता

श्री. संजय चित्रे

नेता

श्री. दिपक पायगुडे

नेता

श्री. प्रमोद (राजू) पाटील

नेता

श्री. जयप्रकाश बाविस्कर

नेता

श्री. राजेंद्र वागस्कर

नेता

श्री. अभिजित पानसे

नेता

श्री. अमित ठाकरे

नेता

श्री. दिलीप धोत्रे

नेता

श्री. संदीप देशपांडे

नेता – प्रवक्ता

श्री. अविनाश जाधव

नेता

श्री. राजू उंबरकर

नेता

पक्षाचे सरचिटणीस

श्री. मनोज चव्हाण

सरचिटणीस 

श्री. परशुराम उपरकर

सरचिटणीस

श्री. प्रकाश भोईर

सरचिटणीस

श्री. हेमंत गडकरी

सरचिटणीस

श्री. राजीव चौगुले

सरचिटणीस

ॲड. राजेंद्र शिरोडकर

सरचिटणीस – प्रवक्ता 

सौ. शालिनी ठाकरे

सरचिटणीस

श्री. रिटा गुप्ता

सरचिटणीस

श्री. संजय नाईक

सरचिटणीस 

श्री. वैभव खेडेकर

सरचिटणीस

श्री. अशोक मुर्तडक

सरचिटणीस

श्री. किशोर शिंदे

सरचिटणीस

श्री. वागीश सारस्वत

सरचिटणीस

श्री. संदीप दळवी

सरचिटणीस

श्री. हेमंत संभूस

सरचिटणीस – प्रवक्ता

श्री. नयन कदम

सरचिटणीस

श्री. अमेय खोपकर

सरचिटणीस

श्री. अजय शिंदे

सरचिटणीस

श्री. संतोष नागरगोजे

सरचिटणीस

श्री. रणजित शिरोळे

सरचिटणीस

श्री. बाळा शेडगे

सरचिटणीस

श्री. गणेश सातपुते

सरचिटणीस

श्री. योगेश परुळेकर

सरचिटणीस

श्री. कीर्तिकुमार शिंदे

सरचिटणीस

।  पक्षाविषयी : प्रमुख भूमिका

पक्षाविषयी : अंगीकृत संघटना  ।

शेअर करा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.

दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.

दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .

© २०२३ सर्व हक्क आरक्षित. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मध्यवर्ती कार्यालय.