loader image
Select Page

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

आंदोलनं व उपक्रम

समाजाभिमुख उपक्रम

आंदोलनं व उपक्रम

समाजाभिमुख उपक्रम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जन्म हा फक्त निवडणुकांसाठी झालेला नाही. आमचा प्रत्येक महाराष्ट्र सैनिक जनतेला आधार वाटला पाहिजे. राजकारणापलीकडेही जनतेशी ऋणानुबंध जुळायला हवेत, हाच त्या समाजकारणामागचा हेतू असतो.

7

विविध सामाजिक-सांस्कृतिक उपक्रम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्थापनेपासून अभिनव उपक्रम राबवून मराठी समाजाची बलस्थानं सर्वांसमोर ठेवली. स्वतः राजसाहेबांनी शिवतीर्थावर ‘महाराष्ट्र धर्म’ हे भव्य पुस्तक प्रदर्शन भरवलं होतं. ज्या प्रदर्शनाला महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांनी भेट दिली, त्या कार्यक्रमात भारतरत्न सचिन तेंडुलकर ह्यांनी त्यांचे वडील व ज्येष्ठ कवी स्व. रमेश तेंडुलकर ह्यांनी लिहिलेली कविता वाचून दाखवली होती. लता मंगेशकर, बाबासाहेब पुरंदरे, अनेक कवी, लेखक, संपादक अशा सर्व मान्यवरांनी ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली होती.

त्याचप्रमाणे विविध कार्यक्रमांमधून प्रख्यात आणि नवोदित मराठी कलाकारांना कला सादर करण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. जेव्हा २०१३ साली भारतीय चित्रपटसृष्टीला १०० वर्ष पूर्ण झाली तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेतर्फे अनेक कलाकार, तंत्रज्ञ ह्यांना विमा संरक्षण देण्यात आलं होतं. तसंच ज्येष्ठ कलावंतांना आर्थिक मदत करण्यात आली होती.

| शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे

मांसाहारी खवय्यांसाठी मुंबईत दादरमध्ये मनसे नेते श्री. नितीन सरदेसाई दरवर्षी कोळी महोत्सव भरवतात. तसंच नवोदित कलाकारांना हक्कच व्यासपीठ मिळावं म्हणून कल्याण-डोंबिवलीत मनसे नेते श्री. राजू पाटील ह्यांनी ‘जत्रा : कला महोत्सव’ भरवला होता. महाराष्ट्राचं महावस्त्र समजली जाणारी आणि मराठी स्त्रियांना जिचं प्रचंड आकर्षण आहे, ती पैठणी, तिचे विविध प्रकार एकाच ठिकाणी पाहता यावे, खरेदी करता यावे ह्यासाठी मनसे सरचिटणीस सौ. शालिनी ठाकरे ह्यांनी मुंबईत ‘सखी : पैठणी महोत्सव’ भरवला होता.
स्त्रियांना स्व-संरक्षणाचं प्रशिक्षण मिळावं ह्यासाठी मनसे नेते श्री. बाळा नांदगावकर ह्यांनी मुंबईत स्त्रियांसाठी ‘प्रशिक्षण शिबीर’ आयोजित केलं होतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहर आणि ‘डोंबिवली रोटरी क्लब एलिट (डोंबिवली)’ यांच्या सयुंक्त विद्यमाने वर्ष २०१३ पासून सातत्याने ‘जेष्ठ नागरिकांसाठी डोंबिवली मँरेथॉन स्पर्धा’ आयोजित येते आली होती, ह्या उपक्रमाला सुमारे ५०० हुन अधिक ज्येष्ठ डोंबिवलीकर सहभाग घेतात. तसंच विविध पदाधिकारी क्रीडा महोत्सव, कला महोत्सव, कवी संमेलन असे विविध उपक्रम राबवून खेळाडू, कलाकार, लेखक ह्यांना व्यक्त होण्याची संधी देतात.
महाराष्ट्रात विविध भागात लज्जतदार आणि वैविध्यपूर्ण पदार्थांची दीर्घ परंपरा आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र अशा सर्व भागातील चविष्ट आणि पारंपरिक पदार्थांचा आस्वाद प्रत्येकाला घेता यावा ह्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महानगरांमध्ये खाद्य महोत्सव भरवले जातात. महाराष्ट्रात विविध भागातील चटकदार मिसळ खवय्यांना एकाच ठिकाणी चाखता यावी ह्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मिसळ महोत्सव आयोजित केले जातात.

| शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे

मनसे सरचिटणीस रिटा गुप्ता ह्यांनी विविध भागातील ‘महिलांसाठी मोफत कर्करोग निदान शिबिरांचं’ आयोजन केलं आहे. या शिबिरात स्तन तपासणी, पॅप स्मिअर एच.पी.व्ही., कान, नाक, घसा आणि रक्तदाब तपासणीही करण्यात येते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ‘स्वच्छतागृह माझा अधिकार’ ह्या मोहिमेअंतर्गत विविधं आदिवासी पाड्यांमध्ये स्वच्छतागृह उभारली गेली. तसंच सॅनिटरी नॅपकिन्स ह्या महिलांचा, विद्यार्थिनींचा अधिकार आहे. त्यामुळे मुंबई परिसरातील विविध महाविद्यालयांमध्ये ‘सॅनिटरी नॅपकिन्स व्हेंडिंग मशिन्स’ बसविण्यात आली.

शासनानेही ह्या निषिद्ध मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या विषयाला संवेदनशीलतेने पहावं ह्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कमालीचा पाठपुरावा करण्यात आला होता. सॅनिटरी नॅपकिनवरचा जीएसटी रद्द व्हावा, शाळा-महाविद्यालयं-विद्यापीठं अशा संस्थांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स व्हेंडिंग मशीन बसवणं गरजेचं आहे, अर्थसंकल्पात ह्या सामाजिक मोहिमेसाठी विशिष्ट निधीची तरतूद करण्यात यावी अशा मागण्यासांठी पक्षातर्फे अगदी केंद्रीय अर्थमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा करण्यात आला.

महाराष्ट्रात जेव्हा एच१ एन१ ची साथ आली होती तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पुणे येथे एक प्रदीर्घ शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. कोरोना महामारीतही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांनी उल्लेखनीय वैद्यकीय मदत केली होती. त्याचप्रमाणे रक्तदान शिबीर, दैनंदिन तपासणी, नेत्रचिकित्सा शिबीर अशी विविध आरोग्य शिबीर पक्षातर्फे आयोजित केली जातात.

। आंदोलनं व उपक्रम : विद्यार्थी आंदोलनं

आंदोलनं व उपक्रम : आपत्तीतलं मदतकार्य । 

शेअर करा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.

दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.

दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .

© २०२३ सर्व हक्क आरक्षित. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मध्यवर्ती कार्यालय.