loader image
Select Page

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

पक्षाविषयी

पाकिस्तानी कलाकारांना हुसकावले!

आंदोलनं व उपक्रम

पाकिस्तानी कलाकारांना हुसकावले!

‘नापाक’ देशातील कलाकारांना भारतात का बोलावले जाते? त्यांना संधी का दिली जाते? १५० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात सरस कलावंत असतानाही पाकड्यांना आवताण का?

7

पाकिस्तानी कलाकारांना हुसकावले!

जो देश दहशतवाद्यांना आसरा देतो, सातत्याने भारतावर दहशतवादी हल्ले करतो, ज्यात आमचे भारतीय सैनिक धारातीर्थी पडतात. अशा पाकिस्तानातील कलाकार भारतात येतात, इथल्या कलासृष्टीत धनसंपत्ती कमावतात आणि निघून जातात आणि पुन्हा तो पाकिस्तान भारतावर दहशतवादी हल्ला करतो. अशा ‘नापाक’ देशातील कलाकारांना भारतात का बोलावले जाते? त्यांना संधी का दिली जाते? १५० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात सरस कलावंत असतानाही पाकड्यांना आवताण का? असे उद्विग्न प्रश्न उपस्थित करत राजसाहेबांनी कायम पाकड्या कलाकारांचा विरोध केला आहे.

अनेकदा चित्रपट सृष्टीशी पत्रव्यवहार करून पाकिस्तानी कलाकारांना, कलाकृतींना भारतात थारा देऊ नका अशी सक्त ताकीदही देण्यात आली होती. तरीही काहींना पाकड्यांच्या पुळका येतोच. असंच एका निर्मात्याने एक पाकिस्तानी कलाकारांच्या-तंत्रज्ञांच्या साहाय्याने निर्मित ‘बिन रोये’ हा चित्रपट भारतातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्याचा प्रयत्न सुरु केला, तात्काळ महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेने खास मनसे शैलीत निर्मात्यांशी-प्रवर्तकांशी संपर्क साधला आणि त्या चित्रपटाचं भारतातील प्रदर्शन रोखलं.

| पाकड्या कलाकारांना हुसकावले; राजसाहेबांची पत्रकार परिषद 

२०१६ साली उरी येथे पाकिस्तानमार्फत दहशतवादी हल्ला झाला. भारतीय जवान धारातीर्थी पडले, देशभर संतापाची लाट उसळली. भारतीय जवानांची पार्थिव त्यांच्या घरी परतत होती. पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला हवं असा सूर देशभर उमटू लागला. आणि येऊ घातलेल्या काही हिंदी चित्रपटांमध्ये पाकिस्तानी कलाकार घेण्यात आल्याचं कळालं. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेतर्फे लगोलग पत्रकार परिषद बोलावण्यात आली. पाकिस्तानी कलाकारांनी ४८ तासात भारतातून निघून जावं अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोषास सामोरं जावं लागेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भूमिकेला देशभरातून मिळणारा प्रतिसाद पाहता पाकिस्तानी कलाकारांनी भारतातून पळ काढला. निर्लज्जपणाचा कळस म्हणजे ह्याच पाकिस्तानी कलाकारांनी पाकिस्तानात परतल्यानंतर उरी हल्ल्याबाबत भारतविरोधी, भारतीय सैन्याविरोधी आक्षेपार्ह विधानं केली. आणि अशा पाकिस्तानी कलाकारांना हुसकावणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका सार्थ होती हे सर्वांनाच पटलं.

| आंदोलनं व उपक्रम : मराठी मनांसाठी, हिंदू सणांसाठी

आंदोलनं व उपक्रम : विद्यार्थी आंदोलनं  |

शेअर करा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.

दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.

दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .

© २०२३ सर्व हक्क आरक्षित. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मध्यवर्ती कार्यालय.