loader image
Select Page

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

आंदोलनं व उपक्रम

भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी

महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या रोजगारावर, व्यवसायाच्या संधींवर सर्वप्रथम मराठी माणसांचाच अधिकार असायला हवा किंबहुना आहे, हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रमुख आग्रह आहे.

7

पक्षाविषयी

भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी

रेल्वेभरती आंदोलन

महाराष्ट्रात रेल्वेभरतीमध्ये स्थानिक मुलं-मुलींना डावलून परप्रांतीयांना घुसविण्याचे प्रयत्न सुरु आहेत असं समजताच राजसाहेबांनी मुंबईतील एका सार्वजनिक कार्यक्रमात त्याविरोधात आवाज उठवला. महाराष्ट्रात रेल्वेभरतीची माहिती न देता, इथल्या स्थानिकांना अनभिज्ञ ठेवून ज्या राज्याचे (बिहारचे) रेल्वेमंत्री आहेत त्या राज्यात रेल्वे भरतीची जाहिरात दिली जाते आणि तिथून महाराष्ट्रात लोंढेच्या लोंढे रेल्वे भरतीसाठी आदळतात. हे जेव्हा महाराष्ट्र सैनिकांना दिसलं, तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आक्रमक आंदोलनं सुरु झालं. स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय्य रोजगाराचं हे आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं राज्यव्यापी आंदोलन ठरलं.

त्यानंतर पक्षाची भूमिका, स्थानिकांचा आग्रह न समजून घेता काही तथाकथित राष्ट्रीय वाहिन्यांनी राजसाहेबांवर, ह्या आंदोलनावर जहरी टीका करायला सुरुवात केली. देशभर महाराष्ट्रविरोधी वातावरण निर्माण करण्यात आलं, हितसंबंध दुखावलेल्या पुढाऱ्यांनी प्रचंड दबाव आणला. आणि, प्रक्षोभक भाषण केल्याच्या आरोपावरून २२ ऑक्टोबर २००८ रोजी राजसाहेबांना रत्नागिरी येथे अटक करण्यात आली. ह्या अटकसत्रानंतर महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. जनक्षोभ होऊ नये म्हणून राजसाहेबांनी सुटका करण्यात आली. त्यानंतर तत्कालीन सरकारतर्फे राजसाहेबांवर भाषणबंदी करण्यात आली. तरीही, राजसाहेब इतर माध्यमातून भूमिपुत्रांच्या न्याय्य-हक्कांची भूमिका घेत राहिले, मांडत राहिले. दुसरीकडे महाराष्ट्र सैनिकांची विविध स्तरावर आंदोलनं सुरु होती. हा संघर्ष कित्येक महिने सुरु होता.

सरतेशेवटी तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका योग्य असल्याची निर्वाळा देत, रेल्वे भरतीत स्थानिकांना प्राधान्याने संधी मिळायला हवी, असा आदेश दिला. हा आदेश म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाचा विजय होता.

ह्या यशस्वी लढाईनंतर पुढचा टप्पा होता तो स्थानिकांना यथायोग्य प्रशिक्षण देण्याचा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नोकर भरतीची जाहिरात प्रकाशित झाली की राज्यातील विविध विभागांमध्ये नोकर भरती मार्गदर्शन शिबीराचं आयोजन करण्यात यायचं, इच्छुकांना भरती प्रक्रियेची इत्यंभूत माहिती दिली जायची. आजतागायत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठपुराव्यामुळे २ हजाराहून अधिक स्थानिक उमेदवार रेल्वे सेवेत रुजू झाले आहेत.

२०१५ साली रेल्वे भरती बोर्डाने विविध पदांकरिता प्रकाशित केलेल्या परिपत्रकात २२०४ जागांपैकी फक्त २ जागा मध्य रेल्वेला देऊन महाराष्ट्राच्या उमेदवारांवर अन्याय करण्याचा प्रयत्न केला होता. तात्काळ महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचं शिष्ठमंडळ रेल्वे प्रशासनाला भेटलं. सादर बाबीबद्दल जाब विचारला. तीव्र आंदोलनाचा इशारा देताच महिन्याभरात महाराष्ट्रासाठी ५०० जागांसाठीच्या नोकरभरतीची जाहिरात मराठी वृत्तपत्रात देण्यात आली. अशाप्रकारे जगता पहारा ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थानिकांच्या न्याय्य-हक्कांसाठी तत्पर असते.

अनधिकृत रिक्षा-टॅक्सीविरोधात आंदोलन

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने अनधिकृत रिक्षा-टॅक्सी तसंच विनापरवाना वाहन चालवणाऱ्या चालकांविरोधात मोहीम सुरु केली. प्रमुख शहरांमध्ये वाहनांचं सर्वेक्षण करण्यात आलं, परवान्यांची पडताळणी केली गेली आणि धक्कादायक वास्तव समोर आलं. ज्यांच्या विश्वासावर तुम्ही-आम्ही शहरात वाहतूक करत होतो, त्यातले हजारो रिक्षा-टॅक्सी ह्या अनधिकृत होत्या.

| शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे

अखेर सर्व बाबी पोलीस सालच्या वाहतूक शाखेला दिल्यावर ती हजारो अनधिकृत वाहनं नष्ट करण्यात आली. त्यानंतर जेव्हा २०१६ साली, रिक्षा-टॅक्सीचे परवाने विरणाची घोषणा झाली तेव्हा हे परवाने इथल्या स्थानिक भूमिपुत्रांनाच मिळावेत म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र आंदोलनं केली.

आता समृद्ध महाराष्ट्र
झालाच पाहिजे!

रोजगार निर्मितीसंदर्भात अथवा धोरण निर्मितीसाठी आपली योजना, आपली कल्पना आमच्यापर्यंत पोहचवा .

रोजगार-स्वयंरोजगाराच्या संधी

महाराष्ट्रात सर्वदूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रोजगार मेळाव्यांचं आयोजन केलं जातं. विविध ठिकाणी स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे ह्यासाठी मुंबईत पक्षातर्फे १०० ऑटो रिक्षा वाटण्यात आल्या, ठाण्यात रिक्षा परवान्यांसाठी मार्गदर्शन केंद्रं उभं करून १५६ महिला उमेदवारांना रिक्षा चालकाचे परवाने मिळवून देण्यात आले, बीडमध्ये विधवा माता-भगिनींना रोजगार मिळावा यासाठी शिवणयंत्रासह प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात आले, त्याचप्रमाणे कोकणातील महिलांना रोजगार देण्यासाठी ‘कोकण नवनिर्माण महिला औद्योगिक संस्थे’मार्फत ग्रामीण भागात लघु उद्योगासाठी प्रोत्साहन देण्यात आलं.

| शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे

सिंधुदुर्ग, सांगली, रायगड, पुणे, नाशिक, संभाजीनगर, नागपूर, यवतमाळ, लातूर अशा सर्व जिल्ह्यांमध्ये पक्षामार्फत मोठ्या प्रमाणावर नोकरी महोत्सवाचे आयोजन करून हजारो तरुणांना-तरुणींना रोजगार मिळवून देण्यात आम्ही यशस्वी ठरलो.

संघटनात्मक मोर्चेबांधणी

जेव्हा जेव्हा इच्छुक उमेदवार किंवा विद्यार्थी नोकरभरतीच्या प्रश्नांसाठी आंदोलनं करतात तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तत्परतेने आंदोलकांच्या समर्थनार्थ मैदानात उतरते. अनेकदा मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे स्वतः व पक्षाचे इतर नेते, पदाधिकारी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतात, संवाद साधतात. आंदोलकांची मागणी सरकारपर्यंत पोहचवतात. मग ते मध्य रेल्वेतील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचं ‘रेल रोको’ आंदोलन असो वा शिक्षकभरती उमेदवाराचं आंदोलन असो.

| शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना कामगारांच्या न्याय्य-हक्कांसाठी अविरतपणे काम करत आहे, प्रसंगी कामगार कायद्यांचं आयुध वापरून तर कधी भूमिपुत्रांच्या न्याय्य मागणीला सर्वतोपरी मानून कामगारांना न्याय मिळवून दिला जातोच. ह्या कामगार संघटनेच्या अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना, महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कर्मचारी सेना, महाराष्ट्र नवनिर्माण हवाई कर्मचारी सेना, महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कर्मचारी सेना, महाराष्ट्र नवनिर्माण वीज कर्मचारी सेना अशा पक्षाच्या इतर संघटना भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी कायम लढा देतात आणि न्याय मिळवून देतात.

| आंदोलन व उपक्रम : जागर मराठीचा 

 आंदोलन व उपक्रम : विकासाचं राजकारण ।

शेअर करा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.

दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.

दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .

© २०२३ सर्व हक्क आरक्षित. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मध्यवर्ती कार्यालय.