पक्षाविषयी
महाराष्ट्र अस्मिता
पक्षाविषयी
महाराष्ट्र अस्मिता
ह्या मराठीपणाचे संरक्षण, जतन आणि त्याची प्रगती करणं हा पक्षाचा ध्यास आहे. “मराठी माणसाचे गोमटे करणे” हा पक्षाच्या विचारांचा आत्मा आहे.
मराठी माणसाचा महाराष्ट्र!
महाराष्ट्र हा मराठी माणसासाठी, मराठी समाजासाठीच आहे. आपली मराठी ओळख आपल्या राज्यातच पुसली गेली तर मराठी माणूस, मराठी समाज हा इतिहासजमा होईल. आपण व्यक्ती म्हणून नक्कीच जगू, यशस्वी होऊ; पण आपल्यातला मराठीपणा, आपली मूळ ओळख नष्ट होईल. आपण स्वत:पासून हरवून जाऊ.
आज जगात कित्येक समूह आहेत, ज्यांची ओळख केवळ त्यांची भाषा संपल्यामुळे पुसली गेली. ते समूह संपले, जगाच्या पटलावरून नाहीसे झाले. आपले तसे व्हायला नकोच; उलट महाराष्ट्राने प्रगती करावी, अनेक क्षेत्रात जगाचे नेतृत्व करावे हे स्वप्न उराशी बाळगले. आणि भाषा व आपला काय संबंध आहे याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. जे समूह नष्ट झाले त्यांचे नेमके काय झाले, तसे का झाले हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि भाशा, आपली ओळख, आणि ती पक्की असल्यावर समाजाची होणारी प्रगती यांचा परस्परसंबंध लक्षात आला.
तो महाराष्ट्रासमोर तेवढ्याच स्पष्टपणे मांडण्याची संधी आम्ही इथे घेत आहोत. आणि महाराष्ट्राची मराठी ओळख पक्की करण्यासाठी काय करावे लागेल हे ही स्पष्ट करत आहोत.
महत्त्वाच्या कल्पना
भाषा आणि समाज
आपल्या भाषेतून, वागण्यातून, प्रत्येक व्यवहारातून आपली मराठी ओळख पक्की करण्यासाठी करायचे प्रयत्न.
नुसतं “मराठी वाचवा, मराठी वाचवा” असं म्हणत बसण्यात काही अर्थ नाही. त्यासाठी मराठी वातावरण महाराष्ट्रात निर्माण करावं लागेल.
दैनंदिन वापरात मराठी
रूढ इंग्रजी शब्दांसाठी मराठी प्रतिशब्द बनविण्याची यंत्रणा.
मराठी भाषेच्या वापरामुळे मराठी भाषिकांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी.
प्रशासनात मराठी
मराठी अस्मिता जपण्यासाठी मराठीचा दैनंदिन शासकीय कामकाजाच्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रचार.
लोकशाहीतून लोकांचे सक्षमीकरण करण्यासाठी लोकांची भाषा ही सरकारची भाषा करणे.
ग्राम पंचायत पासून पालिका, महापालिका, राज्य शासन पातळींवर सर्व प्रकारचा शासकीय व्यवहार मराठीतून.
राज्यातील सर्व न्यायालयांची कारभाराची भाषा मराठी, न्यायदान प्रक्रिया मराठीतून.
डिजिटल जगात मराठी
महाराष्ट्रात विकल्या जाणार्या प्रत्येक संगणकावर मराठी कळफलक तसेच युनिकोड असेल तरच त्याची विक्री केली जाऊ शकेल असा नियम.
शिक्षणात मराठी
मराठी भाषा स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना.
पदवीपर्यंतचे शिक्षण मराठीतून घेण्याची सोय.
प्राथमिक शाळांच्या अभ्यासक्रमामध्ये मराठी भाषा-कला-साहित्य-संस्कृती यांमध्ये शिष्यवृत्ती, संशोधनाच्या संधी.
जागतिक पातळीवर मराठी साहित्य-संस्कृती संशोधनासाठी परदेशी विद्यापीठांशी संधान.
जागतिक व्यासपीठावर मराठी
जगातल्या सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये, जसे लंडन, टोकियो, मॉस्को, न्यूयॉर्क, रोम, पॅरिस, बर्लिन, शांघाय इथे ‘महाराष्ट्र संपर्क केंद्र’ उभारणार.
मराठी साहित्य व कला
महाराष्ट्रातल्या विविध बोली भाषांमधून साहित्य निर्मितीला प्रोत्साहन.
जगभरातल्या देशांमध्ये मराठी श्रेष्ठ कला-साहित्य अभ्यास-संधोधन केंद्रे.
बालसाहित्याकडे विशेष लक्ष.
चित्रपट, नाटक, चित्रकला अशा कालाप्रकारांसाठी रसग्रहण शिबिरे.
राज्याच्या ३५ जिल्ह्यांपैकी प्रत्येक जिल्ह्यात तेथील भौगोलिक व मराठी इतिहासाची, संस्कृतीची वैशिष्ट्य सांगणारे ‘संस्कृती मंदीर’.
इंदू मिल परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक – जगानं आश्चर्य करावं अशा एका अतिभव्य ग्रंथालयाची योजना.
मराठी आणि हिंदी चित्रपटांना फक्त पोलिस परवानगीवर महाराष्ट्रात कुठेही चित्रीकरण शक्य.
राज्याच्या प्रत्येक जिल्ह्याचे स्वतःचे स्थानिक परंतु जागतिक दर्जाचे वैशिष्ट्यपूर्ण कला-प्रदर्शन संग्रहालय.
महाराष्ट्रात चित्रपट चळवळ.
गड आणि किल्ले संवर्धन
गड-किल्ल्यांना ‘सांस्कृतिक पर्यटन क्षेत्र प्रकार’ (Heritage Tourism Destination) असा दर्जा देणे.
‘महाराष्ट्र राज्य किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धन महामंडळ’ स्थापना.
पारंपारिक खेळ
पारंपारिक खेळांचा कोष.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, अनेक खेळांची “पारंपारिक खेळ पर्यटन क्षेत्रे”.
महाराष्ट्र राज्य स्थानिक स्वराज्य संस्था मार्गदर्शन संस्था.
महत्त्वाचे दुवे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.
दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.
दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .