पक्षाविषयी
महामोर्चा
आंदोलनं व उपक्रम
महामोर्चा
एखाद्या मुद्द्यावर, प्रश्नावर जनमत किती तीव्र आहे ह्याची जाणीव व्हावी ह्यासाठी मोर्चे काढले जातात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही पक्ष स्थापनेपासून राज्यव्यापी मोर्चे काढले ते कधी प्रक्षोभ व्यक्त करायला होते तर समर्थनार्थ होते.
इशारा महामोर्चा
| महामोर्चाची क्षणचित्रं
संताप मोर्चा
| संताप मोर्चाची क्षणचित्रं
निषेध मोर्चा
११ ऑगस्ट २०१२ रोजी मुंबईत आझाद मैदानात रझा अकादमीच्या सभेनंतर काही धर्मांध मुस्लिमांनी धुडगूस घालायला सुरुवात केली. पोलिसांवर, माध्यम प्रतिनिधींवर हल्ले केले. ह्या सर्व दंगलीत सुमारे ५८ पोलीस गंभीर स्वरूपात जखमी झाले. कोट्यवधींच्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं. इतकंच काय तर अब्दुल कादिर ह्या दंगेखोराने ‘अमर ज्योती जवान’ स्मारकाची नासधूस केली.
ह्या सर्व धर्मांध उन्मादामुळे फक्त मुंबईतच नव्हे तर संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळली. हा संताप व्यक्त होणं गरजेचं होतं. जनमानसातला राग व्यक्त करण्यासाठी त्याच आझाद मैदानावर श्री. राजसाहेब ठाकरेंनी मोर्चाची हाक दिली आणि मोर्चाची तारीख ठरली २१ ऑगस्ट २०१२. जनतेकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय म्हटल्यावर मोर्चाला कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचे प्रयत्न सुरु झाले आणि म्हणूनच कि काय मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली. मोर्चाबाबत संभ्रमाचं वातावरण निर्माण करण्यात येत होतं. तात्काळ राजसाहेबांनी पत्रकार परिषद घेऊन ‘सर्व गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळूनही रझा अकादमीच्या मोर्च्याला परवानगी दिली जाते आणि पुकारलेल्या शांततामय मोर्चाला परवानगी नाकारली जाते हा दुटप्पीपणा का? हिंदुस्थानात लोकशाही आहे म्हणता आणि लोकशाही मार्गानेच पुकारलेल्या शांततामय मोर्चाला आडकाठी करता, हि काय मोगलाई आहे का?’ असे जळजळीत प्रश्न विचारत ‘मोर्चा होणारच’ अशी वल्गना केली आणि कशाचीही भीडभाड न बाळगता श्री. राजसाहेब ठाकरे नेतृत्वात मोर्चा निघालाच.
| निषेध मोर्चाची क्षणचित्रं
प्रचंड अशा ह्या मोर्चाने धर्मांध मुस्लिमांना सडेतोड उत्तर दिलं. मोर्चा आझाद मैदानावर पोहोचल्यानंतर मोर्चाचं रूपांतर सभेत झालं आणि राजसाहेबांनी उपस्थितांना संबोधित केलं. माध्यमं आणि पोलिसांना पाठिंबा देण्यासाठी काढलेल्या ह्या मोर्चात राजसाहेबांनी हे दंगेखोर कुठून आले? बाबरी मशीद पाडल्यानंतर म्हणा किंवा आसामच्या धर्मांध दंगलीची प्रतिक्रिया दंगलस्वरूपात मुंबईतच कशी उमटते, हे सिद्ध केलं. तसंच भरसभेत आझाद मैदानावर सापडलेल्या एका बांग्लादेशी घुसखोराचं पारपत्र (पासपोर्ट) दाखवत घुसखोरीच्या धोक्याचा स्रोत नक्की कुठून आहे हेही सांगितलं. ह्या संपूर्ण दंगलीदरम्यान बेजबाबदारपणे वर्तन करणाऱ्या पोलीस आयुक्तांचा राजीनाम्याची मागणी करण्यात आली आणि पुन्हा जर आमच्या पोलीस बांधव-भगिनी अथवा महाराष्ट्राच्या जनतेकडे कुणी वाकडी नजर करून पाहिलं तर गाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी आहे असं धर्मांधांना ठणकावलं.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ह्या प्रचंड निषेध मोर्चामुळे जनमानसातील खदखद व्यक्त झाली. सर्वपक्षीय नेत्यांनी, सामाजिक संस्थांनी मोर्चाचं भरभरून कौतुक केलं. सर्वबाजूने लोकजागृतीचा दबाव वाढत गेल्याने बेजाबदारपणे लागलेल्या पोलीस आयुक्तांची उचलबांगडी करण्यात आली.
जिथे जिथे म्हणून अन्याय दिसेल
तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे!
अन्यायाविरुद्ध वाचा ‘फोडण्या’साठी आणि व्यवस्थेचं लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सदैव तत्पर.
परिवहन (एसटी) कामगार मोर्चा
| शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे
दंडुका मोर्चा
२०१३ ते २०१८ महाराष्ट्राने दुष्काळाच्या झळा सोसल्या. प्रामुख्याने मराठवाडा दुष्काळात अगदी होरपळला होता. ह्या काळात दिवसाला सरासरी ४ शेतकरी आत्महत्या करत होते. ह्या भीषण परिस्थितीपुढे बळीराजा हतबल झाला. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शेतकऱ्याने स्वाभिमानाने उभं राहावं, लढावं ह्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘दंडुका मोर्चा’ पुकारला.
| दंडुका मोर्चाची क्षणचित्रं
गिरणी कामगारांच्या न्याय्य-हक्कांसाठीचा मोर्चा
| गिरणी कामगारांच्या न्याय्य-हक्कांसाठीचा मोर्चा
महत्त्वाचे दुवे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.
दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.
दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .