loader image
Select Page

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

पक्षाविषयी

मराठी मनांसाठी, हिंदू सणांसाठी

आंदोलनं व उपक्रम

मराठी मनांसाठी, हिंदू सणांसाठी

सणांमध्ये काही विघ्नसंतोषी घटक असतील तर आम्ही दूर करायला पुढाकार घेऊ परंतु हिंदूंच्या सहिष्णुतेची सबब पुढे करून आमच्या सणांवर गंडांतर येणार असेल तर आम्ही ते मान्य करणार नाही.

7

दहीहंडी – मराठी एकीचा सण

राज्य सरकारच्या कचखाऊ भूमिकेमुळे सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडी सारख्या पारंपरिक सणांवर निर्बंध लादले. सर्वोच्च न्यायालयानेही गोविंदा पथकांची बाजू न समजून घेताच परस्पर निकाल दिला. एरव्ही गोविंदा पथकांच्या बळावर स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणारे सर्व राजकीय पुढारी गप्प बसले. सर्व ठिकाणी दहीहंडी रद्द करण्यात येत होती, गोविंदा पथकांमध्ये अन्यायाची प्रचिती येत होती, त्यामुळे संतप्त गोविंदा पथकं श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांना भेटले. राजसाहेबांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारच्या कचखाऊ भूमिकेवर व न्यायालयाच्या एकांगी निर्णयावर आक्षेप नोंदवले.

| ‘दहीहंडी’ सणावर निर्बंध लादल्यानंतर श्री. राजसाहेब ठाकरे आक्रमक 

राजसाहेब ठाकरे ह्यांनी मांडलेली भूमिका :

  • दहीहंडी सारख्या सणाचं बाजारीकरण झालंय, त्यात काही गैरप्रकार आहेत ते दूर झाले पाहिजेत, हे मान्य पण न्यायालयं उठसुठ हिंदू सणांवर का आक्षेप घेतंय ? म्हणे दहीहंडीत अपघात होतात, रक्त सांडतं. मग मोहरमच्या मिरवणुकीत पण लोकं स्वतःला रक्तबंबाळ करतात, तेंव्हा रक्त सांडत नाही का? त्याचं काय? मशिदीच्या भोंग्यांचं ध्वनिप्रदूषण होत नाही का? त्यांच्या सणांवर काही कारवाई करणार नाही कारण का तर दंगली होतील ही भीती.
  • दहीहंडीत अपघात होतात म्हणून त्याच्यावर बंदी. ऑलिम्पिकमध्ये जिमनॅस्टना अपघात होतात, क्रिकेट खेळताना अपघात होतात मग ऑलिम्पिकमध्ये भाग घ्यायला किंवा क्रिकेट खेळायला पण बंदी घालणार का? राज्य सरकारने देखील कोर्टात योग्य बाजू मांडली नाही, जर ती मांडली असती तर ही वेळच आली नसती. मुळातच राज्य सरकारच्या हेतूंबद्दल शंका आहे. खरंच त्यांना हिंदूंच्या सणांबद्दल काही वाटतं का?
  • दहीहंडी गोविंदा पथकांत लहान मुलांना सामावून घेतात जे चुकीचंच आहे, ते थांबलंच पाहिजे. माझा आक्षेप न्यायालयाने जी थरांवर मर्यादा घातली आहेत त्यावर आहे. दहीहंडी हा आमचा सण आहे, तो पारंपरिक पद्धतीनेच साजरा व्हायला हवा.

अशी भूमिका मांडत राजसाहेबांनी, “सुरक्षेच्या सर्व उपायोजना अंगीकारून दहीहंडी उत्साहात साजरी करा, भविष्यात जो काही संघर्ष होईल त्याची जबाबदारी मी घेतो.” असं गोविंदा पथकांना आश्वस्त केलं. राजसाहेबांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्वत्र पारंपरिक दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं. तुफान गर्दी, पारंपारीक वाद्य तथा खेळ यांच्यासोबतच गोविंदांच्या सुरक्षेचे सर्व निकष पुर्ण करत गोविंदांनी ठाणे जिल्हाध्यक्ष श्री. अविनाश जाधव ह्यांच्या दहीहंडी सोहळ्यात ९ थर रचले आणि दहीहंडी सणावरचं निर्बंधांचं, नैराश्याचं सावट दूर झालं.

गणेशोत्सव

मुंबई महापालिकेने गणेशोत्सव मंडळांवर अत्यंत जाचक अटी लादून, त्यांना पुरतं हैराण केलं होतं. ह्या विरोधात दक्षिण मुंबईतील ३१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्याकडे दाद मागितली. त्यावेळी राजसाहेबांनी मी तुम्हाला गिरगावात भेटायला येतो असं आश्वासन दिलं होतं. त्याप्रमाणे मुंबईतील खेतवाडी येथे पदाधिकाऱ्यांना भेटायला गेले. गणेश मंडळांशी झालेल्या बैठकीनंतर ‘तुम्ही निर्धास्त मंडप उभारा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे’ असं राजसाहेबांनी गणेश मंडळांना सांगितलं.

| गणेश मंडळांशी झालेल्या बैठकीनंतर ‘तुम्ही निर्धास्त मंडप उभारा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे’ असं राजसाहेबांनी गणेश मंडळांना सांगितलं.

त्यानंतर मनसे नेते श्री. अमित ठाकरे ह्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. ह्यावेळी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताना अमित म्हणाले की. मुंबईतील अनेक मंडळ ही जुनी असून त्यातील अनेक मंडळांनी रौप्य, सुवर्ण, हिरक महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. अशारीतीने पारंपरिक उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना मंडपाच्या परवानग्यांसदर्भात प्रशासन नाहक त्रास देत आहे. त्यावेळी तात्काळ विषय समजून घेऊन मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना गणेशोत्सव मंडळांच्या अडचणी दूर करण्याच्या सूचना दिल्या आणि प्रश्न मार्गी लागला.

गुढीपाडवा

गुढीपाडवा सण हा हिंदू-मराठी वर्षाचा प्रारंभ. ह्या दिवशी प्रत्येक मराठी घरात उत्साहाचं वातावरण असतं. सणाच्या औचित्याने आपल्या वैभवशाली परंपरेचं, आपल्या उदात्त संस्कृतीचं जगाला दर्शन व्हावं ह्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा सण महाराष्ट्रात सर्वत्र सार्वजनिकरित्या जल्लोषात साजरा करायला सुरुवात केली. पारंपरिक वाद्यांसह, पारंपरिक नृत्यप्रकारासह भगवी पताका डौलाने मिरवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शोभायात्रा काढल्या जातात. विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं.

| गुढीपाडवा मेळावा 

तसंच, २०१६ सालापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळाव्याची मुहूर्तमेढ रोवली. नूतन वर्षाचं औचित्य साधून मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे महाराष्ट्राला संबोधित करतात. देशातील विविध विषयांवर त्यांच्या भूमिका परखडपणे मांडतात, ते ऐकणायसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड जनसमुदाय शिवतीर्थावर जमतो.

दिपोत्सव

दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. दिवाळी म्हणजे प्रकाशाची उधळण. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दरवर्षीं मुंबईत शिवतीर्थावर दिव्य रोषणाई करण्यात येते. संपूर्ण शिवतीर्थ अगदी विविध रंगांच्या आकाश कंदिलांनी, विविध प्रकारच्या दिव्यांनी उजळून जातं. त्यामुळेच दिवाळीत शिवतीर्थ मुंबईकरांसाठी, मुंबईत आलेल्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरतं.

| तेजोमय शिवतीर्थ 

दिपोत्सवाच्या त्या रंगीबेरंगी संध्याकाळी लोकांनाही हे क्षण स्वतःसह, मित्रमंडळींसह कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह आवरत नाही. ह्या दीपोत्सवामुळे लोकांचा सणासुदीतला आनंद द्विगुणित होतो. आता ह्याच दीपोत्सवातून प्रेरणा घेऊन राज्यात सर्वत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी दिवाळीत आपापल्या शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी अशाच पद्धतीने रोमहर्षक रोषणाई करतात.

। आंदोलनं व उपक्रम : महामोर्चा 

आंदोलनं व उपक्रम : पाकिस्तानी कलाकारांना हुसकावले ।

शेअर करा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.

दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.

दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .

© २०२३ सर्व हक्क आरक्षित. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मध्यवर्ती कार्यालय.