loader image
Select Page

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

माध्यमं

महत्त्वाची पत्रं

७ मे २०२० । श्री. राज ठाकरे ह्यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडलेल्या सूचना

कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांसमवेत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत मांडलेल्या महत्त्वाच्या सूचना.

कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे ह्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. ह्या बैठकीत महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांसमवेत श्री. राज ठाकरे ह्यांनी सरकारला काही महत्त्वाच्या सूचना केल्या.

● गेला दीड महिना पोलीस अहोरात्रं काम करत असल्यामुळे त्यांना थकवा जाणवतो आहे त्यामुळे ‘राज्य राखीव पोलीस दल’ बोलवण्यात यावं त्यामुळे पोलीस यंत्रणेला थोडीशी का होईना उसंत मिळेल आणि समाजकंटकांवर दरारा राहील.

● स्पर्धा परिक्षांसाठी पुण्यात आलेल्या राज्यातील विविध भागातील विद्यार्थ्यांची त्यांच्या मूळगावी परतण्यासाठी सरकारने व्यवस्था करावी.

● जे परप्रांतीय आपापल्या राज्यात परतले आहेत ते जेव्हा पुन्हा येतील किंवा आणले जातील तेव्हा त्यांची वैद्यकीय तपासणी व आंतरराज्यीय स्थलांतर कायद्यान्वये मजुरांची नोंदणी केल्याशिवाय त्यांना महाराष्ट्रात प्रवेश देऊ नये. जेणेकरून आतापर्यंत जी अनागोंदी माजली होती ते पुन्हा होणार नाही.

● परप्रांतीय परतल्यामुळे काही उद्योग-धंदे ठप्प होणार असतील तर अशा ठिकाणी महाराष्ट्रातील तरुणांना-तरुणींना प्राधान्य द्यावे, सरकारने त्या रोजगारांची माहिती राज्यात सर्वदूर पोहचवावी.

● शैक्षणिक वर्ष आता काही दिवसात सुरु होणार आहे तेव्हा शाळा कशा आणि कधी सुरु होणार? ह्यांची स्पष्टता सरकारतर्फे येणं आवश्यक आहे जेणेकरून पालकांची चिंता कमी होईल.

● शासकीय कर्मचारी, महापालिका कर्मचारी, सफाई कामगार ह्यांना सुरक्षा साधनं अपुरी पडत आहेत, त्यांना मुबलक सुरक्षा साहित्य पुरविण्यात यावं.

● कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या टाळेबंदीमुळे सध्या आणि भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांचं सरकार कसं निराकरण करणार आहे ? अगदी आयत्यावेळी सांगून जनतेला गोंधळात टाकण्यापेक्षा योजनाबद्ध पद्धतीने टाळेबंदी शिथिल करावी कारण लस मिळेपर्यंत टाळेबंदी हा काही उपाय नाही.

। महत्त्वाची पत्रं

शेअर करा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.

दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.

दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .

© २०२३ सर्व हक्क आरक्षित. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मध्यवर्ती कार्यालय.