loader image
Select Page

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

आंदोलनं व उपक्रम

त्रासदायक ‘भोंगे’ बंद केले

आंदोलनं व उपक्रम

त्रासदायक ‘भोंगे’ बंद केले

धर्म हा घरात ठेवा, पण मुसलमान जर तो रस्त्यावर आणणार असतील आणि मशिदींवर अनधिकृत भोंगे लावून जर सामान्य लोकांना त्रास देणार असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही.

7

पाकिस्तानी कलाकारांना हुसकावले!

धर्म हा घरात ठेवा, पण जर तो मुसलमान रस्त्यावर आणणार असतील आणि मशिदींवर अनधिकृत भोंगे लावून जर सामान्य लोकांना त्रास देणार असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही. मशिदींवरचे अनधिकृत भोंगे कानठळ्या बसेपर्यंत वाजत असतात, ज्याचा त्रास सगळ्यांना होतो, त्यातल्या त्यात लहान मुलं आणि वृद्ध माणसांना तर जास्तच होतो. इतकी सरकारं आली गेली, पण कोणीच काहीच कारवाई करायला तयार नाही. अगदी हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या राज्यातील पक्षाचं सरकार येऊन गेलं पण काहीच कारवाई नाही. सगळ्या सरकारांना निर्बंध लादायला फक्त हिंदुधर्मीयच दिसत होते.

लोकं मुकाट सहन करत होते. मशीदीचे लोक मात्र सर्रास कायदा मोडत होते पण बोलणारं कुणीच नव्हतं. राज ठाकरेंनी ह्यावर गुढीपाडव्याच्या सभेत इशारा दिला की हे भोंगे थांबले नाहीत तर आम्हाला लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा म्हणावी लागेल.

| आंदोलनंतरची राजसाहेबांची पत्रकार परिषद

महाराष्ट्रात, महाराष्ट्र सैनिकांनी ठिकठिकाणी हनुमान चालीसा लावली, भोंग्यांचे आवाज थांबले. मुळात असं ध्वनिप्रदूषण कायद्याला पण मान्य नाही. पण हा कायदा मशिदींवरच्या भोंग्यांच्या बाबतीत विसरला जात होता. पण आमचं ‘हनुमान चालीसा’ आंदोलन सुरु झालं आणि राज्यात तर उमटलेच, पण देशभर उमटले. देशभर ह्या विषयवार हिंदू जनमत एकवटलं आणि उत्तरप्रदेश सरकारने ह्याची दखल घेत भोंगे उतरवले. महाराष्ट्रात देखील तात्कालीन महाविकास आघाडी सरकारला नाईलाजाने ते भोंगे उतरवावे लागले. हिंदू जनशक्तीच्या एकजुटीचं हे एक अप्रतिम उदाहरण म्हणावं लागेल.

| आंदोलनं व उपक्रम : मराठी मनांसाठी, हिंदू सणांसाठी

आंदोलनं व उपक्रम : विद्यार्थी आंदोलनं  |

शेअर करा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.

दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.

दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .

© २०२३ सर्व हक्क आरक्षित. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मध्यवर्ती कार्यालय.