loader image
Select Page

पक्षाविषयी

लढा चित्रपटसृष्टीच्या न्याय्य हक्कांसाठीचा

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असलेल्या दादासाहेब फाळके ह्यांच्या महाराष्ट्रातच मराठी चित्रपटसृष्टीला मिळणाऱ्या सापत्न वागणुकविरोधात आवाज उठवण्यासाठी निकराची झुंज.

आंदोलनाची भूमिका

मुंबई महाराष्ट्राची राजधानी. जिथं पडद्यावरच्या पहिला हलत्या चित्रांचं दिग्दर्शन, चित्रीकरण, निर्मिती आणि प्रदर्शन करून भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली आणि मजल-दरमजल करत आज इथे फक्त मराठीच नाही तर इतर अन्यभाषिक आणि कोट्यवधींची उलाढाल असणारी भारतीय चित्रपट सृष्टी सुद्धा स्थिरावली आहे. आपल्या देशाची भाषावार प्रांतरचना झाली आहे. त्या त्या राज्यात त्या भाषिक चित्रपटांना प्राधान्य असतं पण महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना मात्र कायदे असूनही डावललं जात होतं.

सुरुवातीला मराठी चित्रपटाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभं करून हिंदी चित्रपटसृष्टीने आणि सिनेमाघर चालकांनी मराठी चित्रपटांची मुस्कटदाबी सुरु केली. नंतर चित्रपट सृष्टीत एक नवी पिढी उदयाला आली, नवे आशय घेऊन मराठी चित्रपटाने ऑस्कर पर्यंत मजल मारली आणि कलावंतांच्या स्वाभिमानाने मोकळा श्वास घेतला. परंतु तरीही गल्लेभरू मानसिकतेला मराठी चित्रपटांना पडदे देण्यात स्वारस्य नव्हतं. ह्या मुजोरीविरुद्ध कुणीतरी दंड थोपटणं गरजेचं होतं म्हणून मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेची’ स्थापना केली. संघटनेचं अध्यक्ष श्री. अमेय खोपकर ह्या तरुण महाराष्ट्र सैनिकाच्या हाती सोपविण्यात आलं.

 

| शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे

चित्रपटांमध्ये मराठी कलाकारांना किंवा पात्रांना दुय्यम वागणूक देण्याविरोधात आवाज उठवणं, निर्मात्यांकडून पिळवणूक होणाऱ्या कलावंतांच्या पाठीशी ठाम उभं राहणं, मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये हक्काचं स्थान मिळवून देणं आणि प्रदर्शनासाठी मुख्य वेळ मिळवून देणं ह्यासाठी आंदोलनं सुरु झाली. कधी प्रतीकात्मक, कधी निषेधात्मक तर कधी ‘खळ्ळखट्याक’ करत मराठी चित्रपटांना न्याय मिळालाच पाहिजे ह्यासाठी श्री. राजसाहेब ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली.

जागतिक क्षितिजावर मराठीचित्रध्वज जाण्यासाठी कलावंताच्या
पाठीशी उभे राहू!

आपले पूर्वज संयुक्त महाराष्ट्रासाठी लढले आपण समृद्ध महाराष्ट्रासाठी लढू!



    आंदोलनाचं फलित

    सर्व कलावंत, दिग्दर्शक, निर्माते ह्यांनी वज्रमूठ बांधल्याने मराठी चित्रपट सृष्टीने कात टाकली. दिवसागणिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनांची तीव्रता आणि मराठी चित्रपटांचा दर्जा वाढत जात होता. एखादा हिंदी चित्रपट आणि मराठी चित्रपट एकाच दिवशी आले तर मल्टिप्लेक्स मालकांची मुजोरी रोखण्यासाठी संयुक्त प्रयत्न सुरु झाले.

    | शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे

    अखेर एके दिवशी सर्व चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, एकपडदा सिनेमागृह, मल्टिप्लेक्स मालक आणि श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांची मनसे मुख्यालयात बैठक पार पडली. ह्या बैठकीत मराठी चित्रपटांना उत्पन्नाचा आणि मुख्य वेळेचा न्याय्य वाटा मिळेल अशी मागणी मान्य झाली आणि मराठी चित्रपटांसाठीच्या संघर्षाची तीव्रता कमी झाली. अर्थात मुंबईत बहूचित्रपटसृष्टी कार्यरत असल्याने हा संघर्ष पुन्हा उफाळत राहील पण सरकारने इच्छाशक्ती दाखवल्यास हाही प्रश्न कायमचा सुटू शकतो.

    पुढे वाचा

    जनमताच्या विकास कल्पना

    पुढे वाचा

    जनमताच्या विकास कल्पना

    पुढे वाचा

    जनमताच्या विकास कल्पना

    पुढे वाचा

    जनमताच्या विकास कल्पना

    पुढे वाचा

    जनमताच्या विकास कल्पना

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.

    दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.

    दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .

    © २०२३ सर्व हक्क आरक्षित. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मध्यवर्ती कार्यालय.