loader image
Select Page

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांनी महाराष्ट्र सैनिकांना संबोधित केले. त्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :

  • महाराष्ट्र सैनिकांवर हल्ले होत आहेत. हे कोण करतंय असं मला जेव्हा विचारलं जातं तेव्हा एकंच सांगतो ज्याने केलंय त्याला आधी कळेल आणि मग इतरांना कळेल कि हे कोण करतंय.
  • माझ्या सहकाऱ्यांचं रक्त मी वाया घालवू देणार नाही. ते महाराष्ट्रासाठी काम करायला आले आहेत. हल्लेखोर आणि त्याचे सूत्रधार असलेल्या फडतूस लोकांसाठी नाही.
  • आपले आमदार राजू पाटील पक्षाची बाजू विधानसभेत भक्कमपणे मांडत आहेत. शोलेमध्ये आहे ते वाक्य… ‘एक हि है लेकिन काफी है’…
  • माझ्या पक्षाच्या राजकीय यशावर प्रश्न विचारतात. अहो, ज्या काँग्रेस पक्षाने ह्या देशावर ६० वर्ष राज्य केलं त्यांची अवस्था आज काय आहे ते पहा. भरतीनंतर ओहोटी आणि ओहोटीनंतर भरती हे निसर्गचक्र. भारतीय जनता पक्षानेही लक्षात ठेवलं पाहिजे आज भरती सुरु आहे कधी ना कधी ओहोटी येऊ शकते.
  • आमच्या आंदोलनाने महाराष्ट्रातील ६५ टोलनाके बंद झाले पण प्रश्न पुन्हा आम्हालाच विचारले जातात. २०१४ पासून गळ्यात-गळे घालणारे भाजपा-शिवसेना म्हणत होते कि ‘टोलमुक्त महाराष्ट्र करू’ त्यांना कुणीही जाब विचारात नाहीत.
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जितकी आंदोलनं केली तितकी गेल्या १७ वर्षात इतर कोणत्याही पक्षाने केलेली नाहीत.
  • म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक डिजिटल माहिती पुस्तिका घेऊन येत आहे. ज्यात पक्षाच्या गेल्या १७ वर्षातील उपक्रमांचा, आंदोलनांचा संक्षिप्त आढावा दिलेला आहे तुम्ही जरूर वाचा आणि ठरवा कि खरंच मनसेने आंदोलनं अर्धवट सोडलं का?
  • आमच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या भुरट्या हिंदुत्ववाद्याची पुढे काय अवस्था झाली ती अख्ख्या देशाने पाहिली. म्हणून म्हणतो, आमच्या नादी लागायचं नाही!
  • भोंग्याविरुद्धच्या आंदोलनात १७ हजार महाराष्ट्र सैनिकांवर खटले भरणाऱ्या मुख्यमंत्र्याला पायउतार व्हावं लागलं. म्हणून म्हणतो, आमच्या नादी लागायचं नाही?
  • महाराष्ट्रात राजकारण्यांचे जे तमाशे सुरु आहेत त्याला जनता विटलेली आहे. आणि ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्वसामान्य घरातून आलेल्या चेहऱ्यांकडे आशेने पाहतेय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर आलेलं मळभ निश्चित दूर होईल !
  • महाराष्ट्रात घृणा आणणारं जे राजकारण सुरु आहे ते मी कधीही ह्यापूर्वी पाहिलं नव्हतं. इतकी गलिच्छ भाषा महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही नव्हती.
  • माध्यमं फक्त नेत्यांचे आरोप-प्रत्यारोपांच्या बातम्या देण्यात रमलेत खरी बातमी कुणी पुढे आणायला तयार नाहीत. आपल्या पत्रकार बांधवांना बातम्या आणायच्या आहेत पण मालक विकले गेले आहेत.
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रझा अकादमीच्या मोर्चाला विरोध केला, आपल्या देशातून पाकिस्तानी कलाकारांना हुसकावले तेव्हा हे भुरटे हिंदुत्ववादी चिंतन करत बसले होते.
  • हिंदुत्व म्हणजे जपमाळ नाही.
  • अजून अनेक विषय बोलायचे आहेत… येत्या २२ मार्चला शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘गुढीपाडवा मेळावा’ होणार आहे तिथे इतर अनेक विषयांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका परखडपणे मांडणार, जरूर या !