आमच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या भुरट्या हिंदुत्ववाद्याची पुढे काय अवस्था झाली ती अख्ख्या देशाने पाहिली. म्हणून म्हणतो, आमच्या नादी लागायचं नाही!
भोंग्याविरुद्धच्या आंदोलनात १७ हजार महाराष्ट्र सैनिकांवर खटले भरणाऱ्या मुख्यमंत्र्याला पायउतार व्हावं लागलं. म्हणून म्हणतो, आमच्या नादी लागायचं नाही?
महाराष्ट्रात राजकारण्यांचे जे तमाशे सुरु आहेत त्याला जनता विटलेली आहे. आणि ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्वसामान्य घरातून आलेल्या चेहऱ्यांकडे आशेने पाहतेय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर आलेलं मळभ निश्चित दूर होईल !
महाराष्ट्रात घृणा आणणारं जे राजकारण सुरु आहे ते मी कधीही ह्यापूर्वी पाहिलं नव्हतं. इतकी गलिच्छ भाषा महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही नव्हती.
माध्यमं फक्त नेत्यांचे आरोप-प्रत्यारोपांच्या बातम्या देण्यात रमलेत खरी बातमी कुणी पुढे आणायला तयार नाहीत. आपल्या पत्रकार बांधवांना बातम्या आणायच्या आहेत पण मालक विकले गेले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रझा अकादमीच्या मोर्चाला विरोध केला, आपल्या देशातून पाकिस्तानी कलाकारांना हुसकावले तेव्हा हे भुरटे हिंदुत्ववादी चिंतन करत बसले होते.
हिंदुत्व म्हणजे जपमाळ नाही.
अजून अनेक विषय बोलायचे आहेत… येत्या २२ मार्चला शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘गुढीपाडवा मेळावा’ होणार आहे तिथे इतर अनेक विषयांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका परखडपणे मांडणार, जरूर या !