loader image
Select Page

संपूर्ण व्हिडीओ : माहीमच्या समुद्रात मुस्लिम धर्मियांकडून अनधिकृत धार्मिक आक्रमण

सरकारचं/प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्यावर काय होतं ते ह्या व्हिडिओत पहा… माहीमच्या मगदूम बाबा दर्ग्याच्या इकडे समुद्रात हे अनधिकृत बांधकाम केलं आहे. मी सॅटेलाईट ईमेजेस पहिल्यात २ वर्षांपूर्वी हे काहीच नव्हतं. इथे नवीन हाजीअली तयार करणं सुरु आहे. दिवसाढवळ्या हे सुरु आहे, आणि तरीही पोलीस, महापालिका ह्यांना दिसलं नाही?

माझी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री/गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस आयुक्त श्री. विवेक फणसळकर ह्यांना विनंती आहे की हे पाहिल्यावर तात्काळ कारवाई करा, हे अनधिकृत बांधकाम तोडा. अन्यथा तिथे आम्ही मोठं गणपतीचं मंदिर उभं करू. आता जे होईल ते होईल.

देशातील राज्यघटना मानणाऱ्या मुसलमानांना मला विचारायचं आहे की, हे तुम्हाला मान्य आहे का? आम्हाला ताकद दाखवण्याची इच्छा नाही पण गरज पडली तर ताकद दाखवायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही.

श्री. राजसाहेब ठाकरे

अध्यक्ष , महाराष्ट्र नवनिर्माण सेना