loader image

About Party

History of the Party

Our aim and dream is to create Maharashtra that the world will envy.

\

वर्ष २००६ : पक्षाची स्थापना

९ मार्च २००६ रोजी श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांनी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली.

वर्ष २००६ : पक्षाची पहिली जाहीर सभा

महाराष्ट्रात राजकीय-सामाजिक क्षितिजावर अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्रचंड जाहीर सभा पार पडली. पक्षाची ध्येय-धोरणं, संघटनात्मक बांधणी विशद करत राजसाहेबांनी संपूर्ण राज्याचा विकास आराखडा आखण्याची घोषणा केली.

वर्ष २००७ : पहिल्या महापालिका निवडणुकांना पक्ष सामोरा गेला

पक्षस्थापनेनंतर १ वर्षातच पक्ष महापालिका निवडणुकांना सामोरा गेला. आणि, इतक्या नवख्या पक्षालाही जनतेने भरभरून मतदान केले.

वर्ष २००८ : मराठी अस्मितेचा एल्गार

रेल्वे भरती परीक्षेत मराठी तरुणांना संधी मिळावी, मराठी चित्रपटांना प्रदर्शनासाठी हक्काचं स्थान मिळावं, शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य व्हावी, दूरसंचार सूचना मराठीत व्हाव्यात, व्यवहारात मराठी, आस्थापनांवर मराठी नामफलक अशा विविध यशस्वी आंदोलनांतून मराठीचा अस्मितेचा स्वाभिमान जागा झाला.

वर्ष २००९ : प्रथमच लोकसभा-विधानसभा निवडणुकांना पक्ष सामोरा गेला

२००९ साली लोकसभा निवडणुकांमध्ये पक्षाच्या उमेदवारांना लाखा-लाखाच्या घरात मतदान झालं. तात्काळ ६ महिन्यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाचे १३ आमदार निवडून आले. फक्त ३ वर्षातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जनाधार मिळाला होता.

वर्ष २०१० : पक्षाला कायमस्वरूपी ‘रेल्वे इंजिन’ हि निशाणी मिळाली

पक्षाची निवडणुकीतील कामगिरी लक्षात घेता निवडणूक आयोगामार्फत पक्षाला निवडणूक लढण्याकरता ‘रेल्वे इंजिन’ ही अधिकृत निशाणी जाहीर झाली.

वर्ष २०११ : स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी महाराष्ट्र सैनिकांना विशेष अभ्यासवर्ग

पक्षाकडे आकर्षिली जाणारी तरुणाई ही कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणारी होती त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार कसा चालतो? राजकीय आयुधं कोणती? पदांची-समित्यांची कर्तव्य कोणती? हि सर्व माहिती ज्यांना पक्षामार्फत निवडणूक लढवायची आहे त्यांना असावी म्हणून परीक्षा घेण्यात आली. हा अभिनव प्रयोग होता त्यामुळे निवडणुकांसाठी पक्षाला उत्तम उमेदवार निवडता आले.

वर्ष २०१२ : पहिला महापौर

२०१२ साली झालेल्या १० महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घवघवीत यश मिळाले. नाशिक शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिले महापौर विराजमान झाले. पुणे शहरात विरोधी पक्षनेता म्हणून स्थान मिळाले, मुंबई-ठाणे शहरात मतदानाचा टक्का लक्षणीय वाढला.

वर्ष २०१२ : निषेध मोर्चा

जेव्हा रझा अकादमीच्या धर्मांध मुस्लिमांनी मुंबईच्या आझाद मैदानावर धुडगूस घातला होता, महिला पोलिसांवर, माध्यमांवर हल्ला केला होता तेव्हा महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. सर्व पक्ष मूग गिळून गप्प बसले होते तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रत्युत्तर म्हणून प्रचंड निषेध मोर्चा काढला आणि दंगेखोरांना संदेश दिला पुन्हा आगळीक कराल तर याद राखा.

वर्ष २०१३ : झंझावाती दौरा

राज्यभरातून उदंड प्रतिसाद मिळत होता म्हणून ‘मत मागण्यासाठी नव्हे तर मत मांडण्यासाठी’ राजसाहेबांनी महाराष्ट्राच्या कोल्हापूर, खेड, सोलापूर, अमरावती, जालना, जळगाव अशा विविध भागात झंझावाती सभा घेतल्या. तसंच दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्याने दुष्काळी मदत घेऊन राजसाहेबांनी राज्याच्या दुष्काळी पट्ट्यात पक्षामार्फत चार छावण्या, जलसाठे, मदतकेंद्रं उभी केली.

वर्ष २०१४ : यशस्वी टोल आंदोलन

राजसाहेबांनी नवी मुंबईत टोल वसुलीचा भ्रष्टाचार समोर आणला. राज्यात सर्वत्र आंदोलनं सुरु झाली, अनधिकृत टोलनाके महाराष्ट्र सैनिकांनी उध्वस्त केले, राज्यव्यापी रास्ता रोकोनंतर राजसाहेबांना ताब्यात घेण्यात आलं आणि राज्य सरकारच्या आमंत्रणानंतर राजसाहेबांनी तज्ञ, संपादक, सामाजिक आंदोलकांसह सरकारसमोर भूमिका मांडली. आणि, त्यानंतर “राज्यातील ६५ टोलनाके बंद करत आहोत”, हे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी विधानसभेत घोषित केलं.

वर्ष २०१४ : महाराष्ट्राचा विकास आराखडा

राजसाहेबांनी पहिल्या जाहीर सभेत घोषणा केल्याप्रमाणे २५ सप्टेंबर २०१४ रोजी राज्याचा विकास आराखडा जनतेसमोर सादर केला. राज्याच्या पुढच्या ५० वर्षाचा सर्वांगीण विकासाचा विचार करून त्यात १७५ हुन अधिक कल्पना मांडल्या गेल्या. स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासात प्रथमच कुण्या राजकीय पक्षाने संपूर्ण राज्याचा विकास आराखडा जनतेसमोर मांडला होता.

वर्ष २०१५ : विकासकामांचं सादरीकरण, शहराच्या विकास आराखड्याची खुली चर्चा

राजसाहेबांनी भारतीय राजकारणात प्रथमच एक नवा पायंडा पाडला तो म्हणजे जाहीर सभांमध्ये विकासकामांचं दृश्य स्वरूपात सादरीकरण करण्याचा. राजसाहेबांनी नाशिकमध्ये ३३ महिन्यात केलेल्या विकासकामांचं सादरीकरण कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत केलं. तसंच शहरांच्या विकास आराखड्यासाठी जाहीर परिसंवाद ठेवून तज्ञांमार्फत सामान्य जनतेपर्यंत पोहचविला.

वर्ष २०१६ : पहिला गुढीपाडवा मेळावा

गुढीपाडवा, हिंदूंचं नववर्ष… नव्या वर्षाच्या प्रारंभी विचारांची गुढी उभारण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळावा आयोजित केला जातो. श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या अमोघ वक्तृत्वाच्या माध्यमातून महाराष्ट्र धर्माची प्रखर भूमिका ऐकणं ही एक स्फुल्लिंग चेतवणारी बाब असते.

वर्ष २०१७ : नाशिक नवनिर्माणपूर्ती

५१० किमीचे खड्डेविरहित रस्ते, मुकणे धरण पाणी पुरवठा योजना, जलशुद्धीकरण प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन आणि खतनिर्मिती प्रकल्प, वनौषधी उद्यान, वाहतूक शिक्षण उद्यान, स्व. बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालय, नाशिक कुंभमेळा व्यवस्थापन, शहर सुशोभीकरण अशी सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्ताकाळात झालेल्या विकासकामांचं राजसाहेबांनी इतर सर्व शहरात सादरीकरण (प्रेझेंटेशन) केलं आणि आरोप-प्रत्यारोप-आश्वासनं ह्यापलीकडे जाऊन निवडणुका लढवल्या जाऊ शकतात हे दाखवून दिलं.

वर्ष २०१८ : महिलांना रोजगाराचं वाटप, नीट आंदोलन

ह्या सर्व घौडदौडीत पक्ष भूमिपुत्रांसाठीच्या रोजगारासाठी आग्रही राहिला. जेट कामगारांना न्याय, महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या पाठपुराव्यामुळे १५०० हुन नोकरदार कायमस्वरूपी सरकारी सेवेत रुजू, महिलांना रिक्षावाटप, शिवणयंत्र वाटप आणि अन्य रोजगार निर्मिती. तसंच नीट परीक्षेचा प्रश्न उभा राहताच राजसाहेबांनी थेट पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी ह्यांच्याशी संवाद साधून ४ लाख नीट विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लावला.

वर्ष २०१९ : निवडणुकांचं वर्ष

विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सरकारांच्या आर्थिक धोरणांवर तीव्र विरोध दर्शविला. पण जेव्हा कश्मीरमधील ३७० कलम हटविलं गेलं तेव्हा श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांनी केंद्र सरकारचं अभिनंदन देखील केलं.

वर्ष २०२० : पक्षाचं पहिलं अधिवेशन व महामोर्चा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं अधिवेशन मुंबईत पार पडलं. ह्या अधिवेशनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवीन ध्वजाचं अनावरण करण्यात आलं. तसंच बांग्लादेशी-पाकिस्तानी नागरिकांना हुसकावून लावा आणि CAA च्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला.

वर्ष २०२१ : महासाथीतील मदतकार्य व प्रगल्भ राजकारण

२०२० सालच्या महामोर्चानंतर लगेचच कोरोना महासाथीमुळे टाळेबंदी घोषित करण्यात आली. तेव्हापासून महाराष्ट्र सैनिक रोगाविषयीची जनजागृती, औषधांचा पुरवठा, विलगीकरणात असणाऱ्यांसाठी सोयीसुविधा, रुग्णशय्यांची व्यवस्था, मदतकक्ष, परराज्यातील मजुरांसाठी जेवणाची सोय अशा मदतकार्यात तत्पर होते. टाळेबंदीत उद्भवलेल्या समस्यांमुळे शिक्षक, डॉक्टर, व्यायामशाळा व्यवस्थापक, डबेवाले, कोळी बांधव, स्वच्छता कर्मचारी, देऊळ प्रशासन, परिचारिका, विद्यार्थी असे सर्व कृष्णकुंजवर येत आणि राजसाहेब त्यांचं म्हणणं ऐकून सरकारशी पाठपुरावा करत आणि दिलासा देत.

“संघर्ष हा कधीही संपत नाही. प्रवास खडतर असला तरी ठाम आहे.
कुठे जायचं हे माहित आहे, जे ध्येय मला-माझ्या
सहकाऱ्यांना गाठायचं ते गाठणारंच हा आत्मविश्वास माझ्याकडे आहे.
जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे.”

श्री. राजसाहेब ठाकरे
अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

\

वर्ष २००६
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना

९ मार्च २००६ रोजी श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांनी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली.

वर्ष २००६
पक्षाची पहिली जाहीर सभा

महाराष्ट्रात राजकीय-सामाजिक क्षितिजावर अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्रचंड जाहीर सभा पार पडली. पक्षाची ध्येय-धोरणं, संघटनात्मक बांधणी विशद करत राजसाहेबांनी संपूर्ण राज्याचा विकास आराखडा आखण्याची घोषणा केली.

वर्ष २००७
पहिल्या महापालिका निवडणुकांना पक्ष सामोरा गेला

पक्षस्थापनेनंतर १ वर्षातच पक्ष महापालिका निवडणुकांना सामोरा गेला. आणि, इतक्या नवख्या पक्षालाही जनतेने भरभरून मतदान केले.

वर्ष २००८
मराठी अस्मितेचा एल्गार

रेल्वे भरती परीक्षेत मराठी तरुणांना संधी मिळावी, मराठी चित्रपटांना प्रदर्शनासाठी हक्काचं स्थान मिळावं, शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य व्हावी, दूरसंचार सूचना मराठीत व्हाव्यात, व्यवहारात मराठी, आस्थापनांवर मराठी नामफलक अशा विविध यशस्वी आंदोलनांतून मराठीचा अस्मितेचा स्वाभिमान जागा झाला.

वर्ष २००९
प्रथमच लोकसभा-विधानसभा निवडणुकांना पक्ष सामोरा गेला

२००९ साली लोकसभा निवडणुकांमध्ये पक्षाच्या उमेदवारांना लाखा-लाखाच्या घरात मतदान झालं. तात्काळ ६ महिन्यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाचे १३ आमदार निवडून आले. फक्त ३ वर्षातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जनाधार मिळाला होता.

वर्ष २०१०
पक्षाला कायमस्वरूपी ‘रेल्वे इंजिन’ हि निशाणी मिळाली

पक्षाची निवडणुकीतील कामगिरी लक्षात घेता निवडणूक आयोगामार्फत पक्षाला निवडणूक लढण्याकरता ‘रेल्वे इंजिन’ ही अधिकृत निशाणी जाहीर झाली.

वर्ष २०११
स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी महाराष्ट्र सैनिकांना विशेष अभ्यासवर्ग

पक्षाकडे आकर्षिली जाणारी तरुणाई ही कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणारी होती त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार कसा चालतो? राजकीय आयुधं कोणती? पदांची-समित्यांची कर्तव्य कोणती? हि सर्व माहिती ज्यांना पक्षामार्फत निवडणूक लढवायची आहे त्यांना असावी म्हणून परीक्षा घेण्यात आली. हा अभिनव प्रयोग होता त्यामुळे निवडणुकांसाठी पक्षाला उत्तम उमेदवार निवडता आले.

वर्ष २०१२
पहिला महापौर

२०१२ साली झालेल्या १० महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घवघवीत यश मिळाले. नाशिक शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिले महापौर विराजमान झाले. पुणे शहरात विरोधी पक्षनेता म्हणून स्थान मिळाले, मुंबई-ठाणे शहरात मतदानाचा टक्का लक्षणीय वाढला.

वर्ष २०१२
निषेध मोर्चा

जेव्हा रझा अकादमीच्या धर्मांध मुस्लिमांनी मुंबईच्या आझाद मैदानावर धुडगूस घातला होता, महिला पोलिसांवर, माध्यमांवर हल्ला केला होता तेव्हा महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. सर्व पक्ष मूग गिळून गप्प बसले होते तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रत्युत्तर म्हणून प्रचंड निषेध मोर्चा काढला आणि दंगेखोरांना संदेश दिला पुन्हा आगळीक कराल तर याद राखा.

वर्ष २०१३
झंझावाती दौरा

राज्यभरातून उदंड प्रतिसाद मिळत होता म्हणून ‘मत मागण्यासाठी नव्हे तर मत मांडण्यासाठी’ राजसाहेबांनी महाराष्ट्राच्या कोल्हापूर, खेड, सोलापूर, अमरावती, जालना, जळगाव अशा विविध भागात झंझावाती सभा घेतल्या. तसंच दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्याने दुष्काळी मदत घेऊन राजसाहेबांनी राज्याच्या दुष्काळी पट्ट्यात पक्षामार्फत चार छावण्या, जलसाठे, मदतकेंद्रं उभी केली.

वर्ष २०१४
यशस्वी टोल आंदोलन

राजसाहेबांनी नवी मुंबईत टोल वसुलीचा भ्रष्टाचार समोर आणला. राज्यात सर्वत्र आंदोलनं सुरु झाली, अनधिकृत टोलनाके महाराष्ट्र सैनिकांनी उध्वस्त केले, राज्यव्यापी रास्ता रोकोनंतर राजसाहेबांना ताब्यात घेण्यात आलं आणि राज्य सरकारच्या आमंत्रणानंतर राजसाहेबांनी तज्ञ, संपादक, सामाजिक आंदोलकांसह सरकारसमोर भूमिका मांडली. आणि, त्यानंतर “राज्यातील ६५ टोलनाके बंद करत आहोत”, हे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी विधानसभेत घोषित केलं.

वर्ष २०१४
महाराष्ट्राचा विकास आराखडा

राजसाहेबांनी पहिल्या जाहीर सभेत घोषणा केल्याप्रमाणे २५ सप्टेंबर २०१४ रोजी राज्याचा विकास आराखडा जनतेसमोर सादर केला. राज्याच्या पुढच्या ५० वर्षाचा सर्वांगीण विकासाचा विचार करून त्यात १७५ हुन अधिक कल्पना मांडल्या गेल्या. स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासात प्रथमच कुण्या राजकीय पक्षाने संपूर्ण राज्याचा विकास आराखडा जनतेसमोर मांडला होता.

वर्ष २०१५
विकासकामांचं सादरीकरण, शहराच्या विकास आराखड्याची खुली चर्चा

राजसाहेबांनी भारतीय राजकारणात प्रथमच एक नवा पायंडा पाडला तो म्हणजे जाहीर सभांमध्ये विकासकामांचं दृश्य स्वरूपात सादरीकरण करण्याचा. राजसाहेबांनी नाशिकमध्ये ३३ महिन्यात केलेल्या विकासकामांचं सादरीकरण कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत केलं. तसंच शहरांच्या विकास आराखड्यासाठी जाहीर परिसंवाद ठेवून तज्ञांमार्फत सामान्य जनतेपर्यंत पोहचविला.

वर्ष २०१६
पहिला गुढीपाडवा मेळावा

गुढीपाडवा, हिंदूंचं नववर्ष… नव्या वर्षाच्या प्रारंभी विचारांची गुढी उभारण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळावा आयोजित केला जातो. श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या अमोघ वक्तृत्वाच्या माध्यमातून महाराष्ट्र धर्माची प्रखर भूमिका ऐकणं ही एक स्फुल्लिंग चेतवणारी बाब असते.

वर्ष २०१७
नाशिक नवनिर्माणपूर्ती

५१० किमीचे खड्डेविरहित रस्ते, मुकणे धरण पाणी पुरवठा योजना, जलशुद्धीकरण प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन आणि खतनिर्मिती प्रकल्प, वनौषधी उद्यान, वाहतूक शिक्षण उद्यान, स्व. बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालय, नाशिक कुंभमेळा व्यवस्थापन, शहर सुशोभीकरण अशी सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्ताकाळात झालेल्या विकासकामांचं राजसाहेबांनी इतर सर्व शहरात सादरीकरण (प्रेझेंटेशन) केलं आणि आरोप-प्रत्यारोप-आश्वासनं ह्यापलीकडे जाऊन निवडणुका लढवल्या जाऊ शकतात हे दाखवून दिलं.

वर्ष २०१८
नीट आंदोलन, रोजगाराचं निर्मिती

ह्या सर्व घौडदौडीत पक्ष भूमिपुत्रांसाठीच्या रोजगारासाठी आग्रही राहिला. जेट कामगारांना न्याय, महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या पाठपुराव्यामुळे १५०० हुन नोकरदार कायमस्वरूपी सरकारी सेवेत रुजू, महिलांना रिक्षावाटप, शिवणयंत्र वाटप आणि अन्य रोजगार निर्मिती. तसंच नीट परीक्षेचा प्रश्न उभा राहताच राजसाहेबांनी थेट पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी ह्यांच्याशी संवाद साधून ४ लाख नीट विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लावला.

वर्ष २०१९
निवडणुकांचं वर्ष

विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सरकारांच्या आर्थिक धोरणांवर तीव्र विरोध दर्शविला. पण जेव्हा कश्मीरमधील ३७० कलम हटविलं गेलं तेव्हा श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांनी केंद्र सरकारचं अभिनंदन देखील केलं.

वर्ष २०२०
पक्षाचं पहिलं अधिवेशन व महामोर्चा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं अधिवेशन मुंबईत पार पडलं. ह्या अधिवेशनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवीन ध्वजाचं अनावरण करण्यात आलं. तसंच बांग्लादेशी-पाकिस्तानी नागरिकांना हुसकावून लावा आणि CAA च्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला.

वर्ष २०२१
महासाथीतील मदतकार्य व प्रगल्भ राजकारण

२०२० सालच्या महामोर्चानंतर लगेचच कोरोना महासाथीमुळे टाळेबंदी घोषित करण्यात आली. तेव्हापासून महाराष्ट्र सैनिक रोगाविषयीची जनजागृती, औषधांचा पुरवठा, विलगीकरणात असणाऱ्यांसाठी सोयीसुविधा, रुग्णशय्यांची व्यवस्था, मदतकक्ष, परराज्यातील मजुरांसाठी जेवणाची सोय अशा मदतकार्यात तत्पर होते. टाळेबंदीत उद्भवलेल्या समस्यांमुळे शिक्षक, डॉक्टर, व्यायामशाळा व्यवस्थापक, डबेवाले, कोळी बांधव, स्वच्छता कर्मचारी, देऊळ प्रशासन, परिचारिका, विद्यार्थी असे सर्व कृष्णकुंजवर येत आणि राजसाहेब त्यांचं म्हणणं ऐकून सरकारशी पाठपुरावा करत आणि दिलासा देत.

“संघर्ष हा कधीही संपत नाही. प्रवास खडतर असला तरी ठाम आहे. कुठे जायचं हे माहित आहे, जे ध्येय मला-माझ्या
सहकाऱ्यांना गाठायचं ते गाठणारंच हा आत्मविश्वास माझ्याकडे आहे. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे.”

श्री. राजसाहेब ठाकरे
अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

। About Party : Affiliated Organizations

Agitations and Programmes  : Marathi Pride ।

शेअर करा

Head Office : Maharashtra Navnirman Sena

2nd Floor, Matoshree Towers, Padmabai Thakkar Marg, Matunga (West), Mumbai, Maharashtra, 400016.

Maharashtra Navnirman Sena

Head Office : 2nd Floor, Matoshree Towers, Padmabai Thakkar Marg, Matunga (West), Mumbai, Maharashtra, 400016.

© 2020 All Rights Reserved. Maharashtra Navnirman Sena.